मनसोक्त हसावे वाटले तर स्वतःवरच कधीतरी हसून बघा
कुठे तरी लांब जावे वाटले तर स्वतःच्याच मनामध्ये जाऊन बघा
बोलावे वाटलेच मनातले एकांतात मोठ्याने स्वतःशीच बोलून बघा
स्वतः पेक्षा जास्त आपल्याला कुणीच समजू शकत नाही
कधीतरी स्वतःजवळ मन मोकळे करून तर बघा
एकटेच जा समुद्रावर , पाय पाण्यात भिजवून बघा
शहर येईल अंगावर कधीतरी त्याला निरखून बघा
सूर्य जाईल पाण्यामध्ये त्याला डोळ्यात साठवून बघा
परतणाऱ्या लाटेसोबत मनाला कधीतरी पाठवून बघा
मग बस शांत किनार्यावर
लाटेसोबत येणाऱ्या मनाची वाट पहात..
निळ्याशार पाण्याला न्याहाळत
डोळे मिटून लाटांच्या आवाजात हळू हळू मिसळून बघा
हात लांबवून कधीतरी मोठा श्वास घेऊन बघा
खरा आनंद स्वतःतच लपलाय
त्याला कधीतरी शोधून बघा....

No comments:
Post a Comment