कामे उरकली न आज थोडा लवकरच निघालो
दोन गजरे घेतले आणि घरी आलो
ती(नंदिनी) पायरीवर भाजी निवडत बसलेली
मला पाहून हसली आणि चहा ठेवायला गेली
मी(निलेश) फ्रेश झालो आणि चहा घ्यायला गेलो
"हिरवी साडी घाल आज" तिला गजरे देत म्हणालो
ती लाजली भारी आणि म्हणाली "आज खुश दिसतेय स्वारी"
मीहि हसलो आणि हिरव्या बांगड्या पण घाल म्हणालो
ती आवरायला गेली तसा मी खिडकीजवळ गेलो
ढग दाटून आले होते.., अलगद हसलो
आणि बांगड्या वाजल्या
माझ्या मनात जुन्या आठवणीच्या सावल्या दाटल्या
वळून पहिले ती हिरव्या साडीत गजरे माळून..
मी जग विसरलो तिला पाहून..
दोघे निघालो चालत चालत
अलगत तिने हात धरला
कळलेच नाही रस्ता कधी सरला
खूप खुश होती..,विचारलेही नाही कुठे जायचेय
मी थांबलो आणि म्हणालो
"आठवतेय ते आडवे नारळाचे झाड?"
ती म्हणाली "मनात ताजेच आहे ते
फक्त झाले होते दृष्टी आड"
तिथे मी तिची वाट पाहत थांबायचो
ती आली कि थोडा वेळ रुसायचो
ती हसली कि सगळा राग विसरून जायचो....
तिच्याकडे पाहिले तिचे डोळे ओलावलेले
खूप दिवसातून वेळ काढून आज
मी तिला जुन्या आठवणींत बोलावलेले
दोघेही बसलो त्या झाडावर आणि.....
पाऊस सुरु झाला
तिच्या माझ्या गोड आठवणींचा रस्ता मोकळा झाला
ती मनसोक्त भिजू लागली आणि मी तिला पाहत राहिलो
खरंच आजच्या पावसामुळे आम्ही ६ वर्ष मागे जाऊन आलो.

No comments:
Post a Comment